Top News मुंबई

मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

Loading...

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व मंत्री हे आज उत्तम काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघा महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहत आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कामाची स्तुती केली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

महाराष्ट्रात सध्या करोनाच्या जास्त चाचण्या होत आहेत. एकंदरीत परिस्थितीवरून करोनावर मात करता येते हे दिसून आलं आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री उत्तम काम करत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. अनेकदा व्हॉट्सअॅपवर खोट्या बातम्या फिरत असतात. त्या बातम्या किंवा ती माहिती खरी आहे किंवा खोटी ही पाहूनच त्या पुढे पाठवल्या पाहिजेत. कोणतीही खोटी माहिती कोणीही पुढे पाठवू नये, असं आवाहन सुप्रिया सुळे त्यांनी केलं आहे.

महाराष्ट्राबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. आपण अधिक खबरदारी बाळगली पाहिजे. आज उद्धव ठाकरेंकडे राज्यातील सर्वजण मोठा भाऊ म्हणून पाहत आहेत. याचा आनंद आहे. वरळी, सांगली आणि बारामती पॅटर्ननं राज्यात कोरोनाविरोधात चांगलं काम केलं आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रस्त्यावर फिरताना कुठेही न थुंकण्याचं सर्वांनी ठरवलं पाहिजे. सर्वांच्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे अनेकांना कुठेही फिरताना थुंकण्याची सवय असते. आपण महाराष्ट्रात एक व्यापक कॅम्पेन करू शकतो. हे कॅम्पेन सुरू झालं पाहिजे असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

माणुसकी मेली?; पोलिसाला धडक देऊन ‘तो’ थांबला नाही

टाळेबंदी शिथील केल्यानंतर मिळाले जवळपास 13500 उद्योगांना परवाने

महत्वाच्या बातम्या-

अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोप्प नाही; शिवसेनेच्या टीकेला भाजप आमदाराकडून प्रत्युत्तर

मे महिन्यात 13 दिवस बँकांना सुट्टी; काही कामं असतील तर आताच करून घ्या…

जगभरात कोरोनाचा हाहाकार, तब्बल 30 लाख लोकांना कोरोनाची लागण तर 2 लाख मृत्यू!

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या