बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी काही त्यांची ट्रॅव्हल एजंट नाही’, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंनी आणखी एकदा बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मला उद्धव ठाकरेंचा अभिमान वाटतो. त्यांनी भावनिक आवाहन करत मनाचा मोठेपणा दाखवला आहे. घरातील मोठा भाऊ कसा असावा तर तो उद्धव ठाकरेंसारखा असावा असं वाटतं, असं स्पष्ट मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल विचारणा केली असताना सुप्रिया सुळेंनी रोखठोक उत्तर दिलं आहे. मी काही त्यांची ट्रॅव्हल एजंट नाही. मला माहिती नाही ते कुठे आहे, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

दरम्यान, आमचं दडपशाहीचं सरकार कधी नव्हतं आणि नसेल. भाजपला त्यांच्या बैठका घ्यायच्या असतील तर त्यांना त्याचा अधिकार आहे, असं मत देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान, म्हणाले…

‘जे नाव एकनाथने दिलं त्याला विरोध नाही’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

भाजपच्या गोटात हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल

“राज ठाकरेंनी कारकूनाला ‘सामना’चं संपादक बनवलंय, हे त्यांनी विसरू नये”

“मनसे पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन, सल्ले घेताना हिशोब बघून घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More