बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिंदे सरकारचा हा हनिमून आणखी किती दिवस टिकणार?”

मुंबई | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न आणि जिल्ह्यांना न मिळालेले पालकमंत्री यावरून शिंदे सरकारला फैलावर घेतलं आहे. दोन महिने झाले अद्याप पालकमंत्री मिळालेले नाहीत त्यामुळे अनाथासारखं वाटतंय, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जात आहेत. पण तशी कामं मात्र होत नाहीयेत. त्यामुळे नवीन सरकारचा हनिमून आणखी किती दिवस टिकणार आहे हे मला कळत नाही, असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.

दरम्यान, आम्ही विरोधक असलो तरी आमची इच्छा आहे की कोणत्याही सराकरने आपला कार्यकाळ पूर्ण करावा. कारण या सगळ्यात सामान्य माणूस भरडला जातो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More