खेळ

“जगात काहीही अशक्य नसतं…” धोनीच्या निवृत्तीवर सुप्रिया सुळेंची खास प्रतिक्रिया

नवी दिल्ली | माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भावुक व्हिडीओ शेअर करत धोनीनं तुमच्याकडून मिळालेलं प्रेम आणि आधार यासाठी मी तुमचा आभारी आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

चाहत्यांकडून धोनीवर कालपासून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन धोनीला खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय क्रिकेटला विश्वविजेता बनविणारा कर्णधार म्हणून तुझं योगदान ग्रेट आहेच पण त्याहीपेक्षा जगात काहीही अशक्य नसतं असा संदेश तुझ्या खेळीतून मिळतो. क्रिकेटच्या विश्वातच नव्हे तर लाखो भारतीयांच्या हृदयात तु अढळपद मिळविले आहेस. तुला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा, अशा शब्दात त्यांनी धोनीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दरम्यान 2008 मध्ये महेंद्र सिंग धोनीला कसोटी टीमचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. त्यानंतर  30 डिसेंबर 2014 रोजी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. आता 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

लालपरीची जिल्हाबंंदी उठणार; सरकारचा महत्वपुर्ण निर्णय येण्याची शक्यता!

“पालकमंत्री बदलणं पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखं नाही”

‘आयसीसी’नं महेंद्रसिंग धोनीसाठी ट्विट केला खास व्हिडीओ

‘हे’ चार वर्ल्ड रेकॉर्ड आहेत केवळ महेंद्र सिंग धोनीच्या नाव

धोनीच्या निवृत्तीवर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या