बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांपाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांनीही घेतली कोरोनाची लस

मुंबई | संपूर्ण देशात 1 मार्चपासून कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण करून घेतल्यानंतर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात जाऊन लस घेतली आहे.

राजकीय नेत्यांनी आता मोठ्या प्रमाणात लस घेण्याची सुरुवात केली आहे. आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या जे जे रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी नुकतीच माझे वय 70 पेक्षा जास्त आहे त्यामुळे कोरोनाची लस तरुणांना आधी दिली पाहिजे आणि त्यांचं आयुष्य वाढवलं पाहिजे माझ्याकडे आता 10-15 वर्ष जीवन आहे असं मत व्यक्त केलं होतं.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून मी कोरोनाची लस घेतली असल्याचं सांगितलं आहे. तसेच, त्यांनी डॉक्टर लहाने यांच्यासह रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून सर्व जनतेनी त्यासाठी नोंदणी करावी आणि आपली वेळ आल्यानंतर लस घ्यावी असं आवाहन त्यांनी या वेळी जनतेला केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! भररस्यात घडलेल्या ‘या’ घटनेनं पुणे हादरलं

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

पोलिसांत तक्रार केल्यामुळे मुलीच्या वडिलांना घातल्या गोळ्या; हाथरसमधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावाला बलात्कार प्रकरणात अटक

“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्या”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More