“निवडणूक संपण्याची वाट बघतोय, नंतर..”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा

Supriya Sule warning to Devendra Fadnavis

Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंभीर इशारा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी काही आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वातावरण आणखीच तापण्याची शक्यता आहे. निवडणूक संपण्याची वाट बघत आहोत, त्यानंतर फडणवीस यांच्यावर केस करणार असल्याचं सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

फडणवीस यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवल्याचं अजितदादा स्वतः भाषणात म्हणाले. अजित पवारांना फडणवीस यांनी फाइल दाखवलीच कशी?आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार, निवडणूक संपण्याची वाट पाहते आहे. त्यानंतर केस करणार असल्याचा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिलाय.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

ज्या व्यक्तीवर आपण केस करतो, त्या व्यक्तीला आपण बोलवून फाईल दाखवतो हे योग्य आहे का? हा संविधानाचा अपमान आहे.  म्हणून आमचं सगळ्याचं म्हणणं आहे की, याचं स्पष्टीकरण फडणवीस यांनी द्यायला हवं. त्यांनी फाईल कशी दाखवली आणि का दाखवली? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे.

“देवेंद्र फडणवीस यांना राज्याला उत्तर द्यावंच लागणार आहे. फडणवीस यांना, ऑन ओथ जेव्हा आपण शपथ घेतो आणि राज्याचे मुखमंत्री असतो, फाईल्स कोणाला दाखवण्याचा अधिकार नाही. त्यांनी अजित दादांना फाइल कशी दाखवली आणि का?, याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे”, असंही सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

सुनेत्रा पवारांना का गोवलं गेलं?

यापूर्वीही सुप्रीया सुळे यांनी त्या फाइल प्रकरणी फडणवीस यांना इशारा दिला होता. “फडणवीस यांनी राज्याची फसवणूक केली आहे. ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच घरी बोलवून घेतलं, एकतर फाईल घरी आणलीच कशी? आणली तर ज्यांच्यावर आरोप केले त्यांना दाखवली कशी?सुनेत्रा पवार यांचंही नाव गोवले गेलं, त्यांचं नाव आणायची काय गरज होती?”, असं सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

News Title :  Supriya Sule warning to Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या –

“..म्हणून पवारांनी अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही”; भुजबळांचा गौप्यस्फोट

प्रेमात यश ते व्यवसायात भरभराटी, आज कुणाचं भाग्य उजळणार?; वाचा राशीभविष्य

‘आमदार नाही तर मंत्री म्हणून…’; संभाजी पाटील निलंगेकरांबद्दल गडकरींचं मोठं वक्तव्य

गद्दार शब्द ऐकताच एकनाथ शिंदे भडकले, रागात गाडीतून उतरले अन्…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांबद्दल व नवऱ्याबद्दल व्यक्त केली खंत!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .