Top News महाराष्ट्र मुंबई

“मी शेतकऱ्याची लेक म्हणून बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार”

मुंबई | गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी दिल्लीत आंदोलनासाठी बसलेले आहेत. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या मात्र कोणताही तोडगा या बैठकांमधून निघाला नाही. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाझीपूर बॉर्डरवर आंदोलकांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.

केंद्र सरकार ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे अशा परिस्थितीत बळीराजाला सध्या आधाराची गरज आहे. गाझीपूरला जाऊन मी शेतकऱ्यांशी आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं पण आज अन्नदाताच आंदोलनाला बसलाय त्याच अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी एक शेतकऱ्याची लेक म्हणून मी गाझीपूरला जाणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

दरम्यान, संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूरला जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली होती.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी आंदोलन- लता मंगेशकर यांचाही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा, म्हणाल्या…

“मुंबईचा नाही, हा तर वरळीचा अर्थसंकल्प”

“आता वर्ष उलटलं, यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसाव लागेल”

दारूड्यांनी रात्रीच्या वेळी ‘या’ अभिनेत्रीचा केला पाठलाग अन्…

अबब! या सेक्स रॅकेटवरील कारवाईनं पुण्यात खळबळ; इतक्या तरुणींना घेतलं ताब्यात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या