“दादांना सांगा ताई आल्या, वहिणींना सांगा ताई आल्या”; पुण्यात जोरदार घोषणाबाजी

Supriya Sule | बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहायला मिळत होती. अनेकांचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं. शरद पवारांनी बारामतीप्रमाणे इतर मतदारसंंघात सभा घेतल्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आपला बारामती बालेकिल्ला राखत विजय मिळवला आहे. अशातच आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत अजित पवारांना डिवचलं आहे.

“दादांना सांगा ताई आल्या, वहिणींना सांगा ताई आल्या”

पुण्यात गुलाल उधळूण सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या समर्थकांनी दादा आणि वहिणींना डिवचलं आहे. अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. मात्र त्याच पुण्यात सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) समर्थकांनी ‘दादांना सांगा ताई आल्या, वहिणींना सांगा ताई आल्या’, अशा घोषणा दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसून येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सुप्रिया सुळे तब्बल 1 लाख 53 हजार 960 मताधिक्याने विजयी

बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील उमेदवार पवारांसमोर उभा होता. यामुळे बारामतीकर जनता संभ्रम अवस्थेत पाहायला मिळाली होती. मात्र अंतिम टप्प्यात म्हणजे मतदानादिवशी बारामतीकरांनी कौल सुुप्रिया सुऴेंना दिला असल्याचं स्पष्ट झालं. सुप्रिया सुळे या तब्बल 1 लाख 53 हजार 960 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. याची जोरदार चर्चा होताना दिसतेय.

पुणे शहरात आता सुप्रिया सुळे यांच्यावर जेसबीने गुलाल तसेच फुलांची उधळण होताना दिसत आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे शहरातील खडकवासला देखील मतदारसंघ येतो. मात्र खडकवासला मतदारसंघ हा भाजपचा मतदारसंघ असल्याचं दिसून आलं आहे. या मतदारसंघातून सुनेत्रा पवार या 21 हजार मतांनी घाडीवर होत्या. तसेच या मतदारसंघातून यंदा दरवर्षीच्या तुलनेत कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा 59.50 मतदान झालं होतं. तसेच 2019 मध्ये बारामती मतदारसंघात 61.70 टक्के मतदान झाल्याचं दिसून आल्याचं पाहायला मिळालं होतं. खडकवासला आणि पुरंदरमध्ये सर्वाधिक कमी मतदान झालं. याचा फायदा हा सुप्रिया सुळेंना झाला.

बारामती लोकसभा मतदारसंघात ही पवार विरूद्ध पवार अशी लढत होती. बारामती मिळवता येईल यासाठी महायुतीने पवार कुटुंबाच्या घरातीलच नेता पवार कुटुंबाविरोधात लढण्यासाठी दिला होता. याचा फायदा महायुतीला होईल अशी आशा होती, मात्र तसं झालं नाही. शेवटी बारामतीकरांनी मोठ्या साहेबांना साथ दिली.

News Title – Supriya Sule Win Baramati Loksabha Election After Pune In Warm Welcome

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

मोदींच्या सभा फेल!, 18 पैकी 15 उमेदवारांच्या नशिबी आला पराभव

सर्वात मोठी बातमी! निलेश लंकेंच्या पीएवर झाला जीवघेणा हल्ला

निकालानंतर सोन्याचे दर आपटले?; जाणून घ्या नव्या किंमती

सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजितदादांचा मोठा निर्णय; युगेंद्र पवारांना धक्का