Top News महाराष्ट्र मुंबई

‘राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा’; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पत्र लिहून  केली आहे.

भारताच्या संविधानाप्रती जागरुकता निर्माण व्हावी, भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या भावनेतून बारामती लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकेच्या क्षेत्रात संविधान स्तंभ उभारले आहेत. हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून तो राज्यभरात राबविण्याची आवश्यकता आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

उद्धवजी ठाकरे आपणास नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय अथवा निमशासकीय जागेवर संविधान स्तंभ उभारण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा. संविधान व लोकशाही व्यवस्थेप्रती सजग नागरिक घडविण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, आपण यावर नक्की सकारात्मक निर्णय घ्याल हा विश्वास आहे, असंही सुळे यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांनंतर अजित पवारांनीही साधला राज्यपालांवर निशाणा; म्हणाले…

बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार- संजय राऊत

अनाथांच्या मातेला ‘पद्मश्री’; सिंधुताईंच्या ‘या’ भाषणानं साऱ्यांच्याच डोळ्यात अश्रू

प्रजासत्ताकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहिदांना आदरांजली

“शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या