बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई महापौरपद कोणाकडे जाणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

धुळे | मुंबई महापालिका निवडणुकांचे वारे वाहायला सुरूवात झाली असताना महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) धुसफूस समोर येत आहे. सध्या आघाडीत बिघाडीच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सुप्रिया सुळे धुळे येथे बोलत असताना मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येईल असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर असेल, असं भाकित सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

शिवसेनेचाच महापौर होणार हे स्पष्टच आहे. मुंबई महापालिकेकडून कोविड काळात जे काम झालंय याचा कोणीच हात धरू शकत नाही. या कामाचं कौतुक फक्त देशात नव्हे तर जगानं केलं आहे, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीपुढे कोणी टिकत नाही, असं वक्तव्य देखील सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. तर मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता असेल असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तर मी स्वत: त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन”

रोहित पवारांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला, म्हणाले…

‘मोराचं लग्न झालं रे…’; मित्राच्या लग्नात मोर बनलेला स्वत:च्या लग्नातही थिरकला, व्हिडीओ पुन्हा व्हायरल

उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने ‘या’ शिवसेना नेत्याने दिला राजीनामा, म्हणाले…

प्राजक्ता माळीचा ‘रान बाजार’मधील बोल्ड अवतार पाहून नेटकरी संतापले!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More