बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरून सुप्रिया सुळेंची ऑनलाईन सभा

मुंबई | पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा मोठ्या प्रमाणात मतदारसंघात होत आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात प्रतिष्ठेची लढाई लढली जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या आजारपणामुळे मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे शरद पवारांना या निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेता येत नाही. त्यातच राष्ट्रवादीच्या खासदार तसेच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनाही मतदारसंघात प्रचाराला जाता आलं नसल्याने त्यांनी थेट ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरून ऑनलाइन सभा घेत पंढरपूरच्या नागरिकांशी संवाद साधला.

कोरोनामुळे ऑनलाईन बैठका आणि चर्चांना मोठ्या प्रमाणात पसंती देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पंढरपूरमधील मतदारांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भारत नाना भालके यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशी दुहेरी टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरून सभा घेतल्याने त्याची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. सुप्रिया सुळे या कायम समाज माध्यमावर सक्रिय असतात. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी मुंबईतूनच पंढरपूरच्या जनतेशी संवाद साधल्याचं पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या –

बहुजन समाजाला वाहिलेली पहिली ई-कॉमर्स वेबसाईट सुरु, अनोख्या प्रयोगाला हवी तुमची साथ

धक्कादायक! शेजारी राहणाऱ्या जोडप्याने पाळीव कुत्र्याचे चक्क गुप्तांग कापले

“ज्याचं जळतं त्यालाच कळतं, लोकांच्या डोळ्यातील अश्रूंवर राजकारण करू नका”

पुढील दोन दिवसांत राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई-कोलकाता सामन्यात असं काय झालं की, शाहरूख खानला मागावी लागली माफी !

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More