‘आई आणि नंदा वहिणीबद्दल बोलाल तर…’; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा?

बारामती | बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार कुटुंबातच राजकीय सामना रंगल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्कंठा लागली आहे. येथील मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांच्यात थेट लढत होत असल्याने पवार कुटुंबातील इतर सदस्यांनीही थेट प्रचाराच्या मैदानात एंट्री केल्याचं पाहायला मिळत आहे. आता सुप्रिया सुळेंसाठी त्यांच्या आई म्हणजेच प्रतिभा पवार (Pratibha pawar) या देखील आपल्या लेकीसाठी राजकीय मैदानात उतरल्याचं दिसून आलं.

सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा?

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बारामतीत आयोजित महिला मेळाव्यात व्यासपीठावर प्रतिभा पवार उपस्थित असल्याचं दिसून आलं. पवार कुटुंबीयातील सुनंदा पवार, शर्मिला पवार, कुंती पवार, रेवती सुळे यांच्यासह अनेक सदस्य व्यासपीठावर असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी आई आणि नणंदेवर झालेल्या टीकेवर संताप व्यक्त केला.

माझ्या आणि रोहितच्या आईवर दोनवेळा बोलला ठीक आहे, तिसऱ्या वेळी बोलला, तर करारा जवाब मिलेगा, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

आमच्या घरातील गोष्टी रोज टीव्हीवर दिसतात, अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत पण देणार नाही. अनेक महिने झालं सहन करत आहे, आता जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका. माझ्या आणि रोहितच्या आईवर दोनवेळा बोलला ठीक आहे, तिसऱ्या वेळी बोलला, तर करारा जवाब मिलेगा, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

आमच्या खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही. बारामती म्हणजे शरद पवार असून दुसऱ्यांनी गैरसमज करू नये हे सगळं आमच्यामुळे आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

प्रतिभा पवार प्रचाराच्या मैदानात

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 1967 पासून सुरू झालेल्या राजकारणापासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या 2019 लोकसभा निवडणुकीपर्यंत कधीही राजकीय व्यासपीठावर न दिसणाऱ्या प्रतिभा काकी पवार आज पहिल्यांदाच खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित असल्याचं दिसून आलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

उद्योगपती अदानी यांना मोठा दणका; ‘या’ 6 कंपन्यांना कारणे दाखवा नोटिस

चित्रा वाघ यांनी तोंड उघडलं त्यांचे खूप आभार…- किरण माने

कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट; श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंची राजकीय खेळी?

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

“स्वतःच्या बिझनेसच्या फायद्यासाठी संसदेत…”; अमोल कोल्हेंच्या आरोपांनी शिरुरच्या राजकारणात खळबळ