बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सुप्रिया ताईंचा ईडीवर पक्का विश्वास आहे’; भाजपची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

पुणे | पुणे महापालिकेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्यानं आता पुण्यात राजकीय रंग उधळले जाऊ लागले आहेत.पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईनंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनावर केलेला खर्च सध्या चर्चेत आहे. कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ईडीमार्फत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काॅग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

“पुणे महापालिका निवडणूका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली. सुप्रियाताईंनी ED मार्फत चौकशीची मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी मानतो आणि त्याचं स्वागत करतो. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ईडी चौकशी बाबतीतही सुप्रियाताईंनी हाच विश्वास कायम ठेवावा”, अशी टीका भाजप नेते आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी  केली आहे.

सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत! सुप्रियाताई यांची खासदारकीची यंदा तिसरी टर्म आहे. 2014 पर्यंत आणि 2019 नंतर त्यांचे बंधू अजितदादा यांनी सातत्याने पुण्याचे नेतृत्व केलं आहे. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आपल्या पक्षाने तर अनेक सुरू होणारे प्रकल्प तोडफोड करून जाळपोळ करून बंद पाडले. मात्र केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कचऱ्यावर झालेल्या खर्चाची मागणी करणे म्हणजे ताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे, असंही मोहोळ म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची ‘युज अँड थ्रो’ची भूमिका – एकनाथ खडसे

पोटनिवडणुकांबाबत ठाकरे सरकारचा निर्णय पक्का; थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

अखेर ट्विटरने हटवला भारताचा चुकीचा नकाशा; जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळा देश दाखवल्याने पेटला वाद!

‘फडणवीस RSSच्या शिकवणीप्रमाणे आरक्षण संपवायला निघालेत’; काँग्रेसचा हल्लाबोल

इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे मुंबईच्या समुद्रातील 200 दशलक्ष लिटर खारं पाणी होणार पिण्यायोग्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More