बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमोल मिटकरींच्या आम्ही पाठीशी; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पुणे । राष्ट्रवादीकडून (NCP) पुण्यातील कोथरूडमध्ये महागाईच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजपच्या होत असलेल्या राजकारणावरही सुप्रिया सुळेंनी टीका केली.

पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख भाजपकडून (BJP) कसे छाटले जातात हे दिसत आहे, असं म्हणत सुप्रिया सुळें यांनी भाजपवर टीका केली आहे. दरम्यान, पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देणाऱ्या अमोल मिटकरींना आमचा पाठिंबा आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं.

पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील एक चांगल्या महिला नेत्या आहेत. त्या कोणत्याही पक्षात राहिल्या तरी त्यांना माझ्या शुभेच्छा आणि प्रेम असेल. असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More