Top News

नांदेडची स्वराली जाधव ठरली ‘सूर नवा-ध्यास नवा’ची महाविजेती

मुंबई |  आपल्या सुरांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘सुर नवा ध्यास नवा’ च्या महाअंतिम सोहळ्याची राजगायिका ठरली आहे नांदेडची स्वराली जाधव.

स्वरालीने या पर्वात सुफी, लावणी, भावसंगीत, भक्तीसंगीत अशी सर्व प्रकारची गाणी गाऊन रसिकांना आपल्या जादुई सुरांनी घायाळ केलं. वडिलांच्या प्रोत्साहानामुळेच मी इथंपर्यंत पोहचू शकले, अशा भावना तीने व्यक्त केल्या.

स्वरालीने वयाच्या चौथ्या वर्षापासून गाणं शिकायला सुरूवात केली होती. आपले वडीलच या प्रवासात आपलं प्रेरणास्थान आहे, असं स्वरालीनं यावेळी सांगितलं.

दरम्यान, स्वरालीला कलर्स मराठीतर्फे एक लाखाचा धनादेश, मानाची सुवर्ण कट्यार आणि केसरीतर्फे USA टूरला जाण्याची संधी मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

अखेर तीन दिवसांनंतर ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन मागे

काँग्रेस मुख्यालयात लागली ‘प्रियांका गांधी-वाड्रा’ नावाची पाटी, भावा शेजारी बहिणीची केबीन!

चालू सामन्यात मैदानावरच क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसला मोठा धक्का, कदाचित ‘हा’ नेता लोकसभा निवडणुक लढणार नाही!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक! भाजपला शह देण्यासाठी प्रशांत किशोरांना घेतलं ताफ्यात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या