सूरजच्या कुटुंबियांच्या ‘त्या’ कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं!

Suraj Chavan l ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन वेगवगेळ्या टास्कमुळे प्रचंड गाजतोय. बिग बॉसच्या घरात सुरजचा साधेपणा प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे. कारण सुरजचं बिनधास्त वागणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. कालच्या भागातही तो प्रेक्षकांना रडवताना दिसून येत आहे. फॅमिली वीकमध्ये सुरज चव्हाणचं कुटुंब बिग बॉसच्या घरात सूरजला भेटण्यासाठी आले असता त्यावेळी त्याच्या कुटुंबाच्या साधेपणामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा भावुक झाले आहेत.

सुरजच्या कुटुंबाने जिंकलं प्रेक्षकांचं मन :

अवघ्या आठ दिवसांवर ‘बिग बॉस मराठी’ पाचचा फिनाले आला आहे. त्यामुळे स्पर्धकांच्या कुटुंबियांना ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांना भेटण्यासाठी बोलावलं जात आहे. सूरज चव्हणाचे कुटुंबिय देखील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आले होते. यावेळी सूरजच्या दोन बहिणी आणि आत्या आल्या होत्या.

यावेळी सूरज आणि आत्या, बहिणीमधील प्रेमळ संवादाने स्पर्धकांसह प्रेक्षकांचं देखील मनं जिंकून घेतलं आहे. सुरज तुझ्यामुळे आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं आहे. सूरजला ‘बिग बॉस मराठी’च्या आलिशान घरात पाहून त्याच्या बहिणींना आणि आत्याला प्रचंड आनंद झाला असल्याचं दिसून येत आहे.

https://www.instagram.com/reel/DAam0oitSIP/?utm_source=ig_embed&ig_rid=a6be3e31-fcca-41e1-a300-1d572614c3b5

Suraj Chavan l नेटकऱ्यांनी केल्या प्रचंड कमेंट्स :

सूरज चव्हाणचे कुटुंबिय त्याला भेटायला आल्याचा व्हीडिओ ‘कलर्स मराठी’कडून देखील शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओवर नेटकऱ्यांनी प्रचंड कमेंट करत त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत. सुरजची इतकी साधी माणसं आहेत, त्या सर्वांनी घरात जायचा आधी चपला देखील काढल्या आहेत. तसेच सुरजने मन जिंकल राव, अशा कमेंट नेटकरी करत आहेत.

याशिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सिझनच्या विजेत्याने देखील विशाल निकम यानेही सूरजच्या या व्हीडिओवर कमेंट केली आहे. तसेच गावाची माणसं आणि गावाची माती आणि गावचा गोडवा हे देखील सगळं माझ्या गावाकडची माणसचं प्रेम… संपला विषय, असं विशाल निकम म्हणाला आहे.

News Title : Suraj Chavan Meet His Family in Bigg Boss Marathi House

महत्वाच्या बातम्या –

‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ यांची चिंता करू नये; भाजप नेत्याचा पलटवार

‘मुंबई’ पुन्हा टार्गेट ? दहशतवादी हल्ल्याचा कट

लग्नाच्या काही महिन्यातच सोनाक्षी नवऱ्याला त्रासली?, धक्कादायक खुलासा समोर

सोने आणि चांदीने उडवली ग्राहकांची झोप; जाणून घ्या आजचा दर

कुंभसह ‘या’ राशींना आज मिळणार शुभवार्ता, वाचा राशीभविष्य!