भाजपने गुलाल उधळला; या उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका

BJP l 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील सुरत लोकसभा जागा ही अशी एकमेव जागा आहे जिथे निवडणुकीपूर्वीच निकाल जाहीर झाला होता. कारण थिटे निवडणुका घेण्याची गरजच उरली नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली आणि भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.

भाजपला पहिलं यश मिळालं :

गुजरातच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. या जागेसाठी प्रमुख भाजपचे मुकेश दलाल यांच्यासह एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. या सर्व उमेदवारांनी अर्जही दाखल केले, मात्र अर्ज माघारीच्या दिवशी नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज तांत्रिक कारणावरून फेटाळण्यात आला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 96.88 कोटी मतदारांनी नोंदणी केली होती. त्यानंतर 64.2 कोटी प्रत्यक्ष मतदान केले आहे. यामध्ये तब्बल 31.2 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तर संपूर्ण मतदानाची प्रक्रिया एकूण 80 दिवस चालली आहे.

BJP l भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध :

लोकसभा निवडणुकीत सुरत लोकसभेतून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी विजयाचा पताका फडकावला आहे. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला होता. भाजपच्या मुख्य उमेदवाराला टक्कर देणारा प्रमुख विरोधी उमेदवाराचा उमेदवारी अर्जच बाद झाल्यामुळे दलाल यांचा विजय जवळपास निश्चित देखील मानला जात होता.

कुम्भानी यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर या जागेवर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या इतर उमेदवारांनीही आपले अर्ज मागे देखील घेतले होते. त्यामुळे या जागेवर भाजप पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांना बिनविरोध विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.

News Title- Surat Loksabha Mukesh Dalal Win

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! निकाल लागण्यापूर्वीच पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?

सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर!

लोकसभेच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना पहिला मोठा धक्का!

निकालाआधीच झळकले नवनीत राणांच्या विजयाचे बॅनर

दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ST महामंडळात ‘इतक्या’ पदांची भरती सुरू