बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज ठाकरे चौरंगी चिरा’, शरद पवारांवरील टीकेनंतर सुरेखा पुणेकर कडाडल्या

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आणखी एकदा निशाणा साधला आहे. शरद पवार जातीयवादी असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे.

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक सरचिटणीस सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पवार साहेबांवर टीका करताना किमान विचार करायला हवा, असं म्हणत सुरेखा पुणेकर यांनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे.

राज ठाकरे चौरंगी चिरा आहेत. त्यांनी व्यवस्थित राजकारण केलं पाहिजे. ठाकरेंनी आता कुठेतरी थांबायला पाहिजे. कोणावरतरी टीका करून जातीपातीचं राजकारण करण्याचे प्रकार ते करत आहेत. हे सर्व प्रकार राज ठाकरेंनी थांबवले पाहिजेत, अशी टीका सुरेखा पुणेकर यांनी केली आहे.

दरम्यान, राज ठाकरेच जातीचं राजकारण करत असल्याचा घणाघात सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. तर तुम्ही मोठे नेते आहात. स्वत:ची प्रतिमा अशी खालावू नका. तुमच्या भूमिकेमुळे समाजात, विशेषत: मुस्लीम समाजात नाराजी आहे. तेव्हा असं राजकारण करू नका, असा सल्ला देखील सुरेखा पुणेकर यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! व्लादिमीर पुतिन ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त, लवकरच शस्त्रक्रिया होणार?

राज ठाकरेंच्या सभेनंतर इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली, महत्त्वाची माहिती समोर

आनंदाची बातमी! लोकल प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“जमलंच तर तुटून पडा भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर, किती दिवस तूप ओढणार आपणच आपल्या पोळीवर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More