मुंबई | सुरेखा पुणेकर यांनी आपल्या दिलखेचक अदाकारीने महाराष्ट्राच्या मनामनात स्थान मिळवलं. आता त्या लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या मनात घर करण्यास सज्ज आहेत, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना आता वेध लागलेत ते आगामी विधानसभा निवडणुकीचे! मी महाराष्ट्रासाठी खुप काही केलं आहे. कलावंत घडवले, जगवले. तंबूतली लावणी सभागृहात आणून ठेवली, अमेरिकेला नेली मग ती विधान सभेत गेली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.
सुरेखा पुणेकर या नुकत्यात बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्या त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बिग बाॅसच्या घरातल्या अनुभवा सांगितले. आणि त्या बरोबरच एका नव्या लढाईसाठी सज्ज असल्याचं घोषणा केली आहे.
दरम्यान, सुरेखा पुणेकरांना लोकसभेला पुणे मतदारसंघातून काँग्रेस तिकीट देणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. आता त्यांना कोणता पक्ष उमेदवारी देतो आणि त्या कोणत्या मतदारसंघातून लढतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आषाढीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीच्या ‘पांडुरंगाच्या’ हातात भगवी पताका’
-न्यूझीलंडला पहिला धक्का; अवघ्या एका धावेवर एक बाद
-पद्मसिंह पाटलांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली होती- अण्णा हजारे
-पुण्यातून 9 वर्षापुर्वी बेपत्ता झालेला तरूण छत्तीसगडमध्ये माओवादी कमांडर…
-सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; राज्य सरकारकडून मोठी घोषणा
Comments are closed.