बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राष्ट्रवादी पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा नाही तर…’; सुरेखा पुणेकरांचं दरेकरांना प्रत्युत्तर

पुणे | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष अशी अप्रत्यक्ष टीका प्रविण दरेकर यांनी के केली होती. त्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे असून राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच यावर सुरेखा पुणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नसुन महिलांचा आदर करणारा पक्ष आहे, असं सुरेखा पुणेकर यांनी म्हटलं आहे. दरेकरांना जर महिलांचा आदर करता येत नसेल तर त्यांनी कमीत- कमी महिलांचा अपमान तरी करू नये, असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या आहेत. त्यासोबतच प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी नाहीतर महिला शांत बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

चित्रपटातील लोकांनाच राजकारणात जाण्याचा अधिकार आहे का?, असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर लावणीतील लोक राजकारणात जाऊ शकत नाहीत का?, असा सवालही उपस्थित केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडुन विधानसभा निवडणुक लढवण्याचा मानस सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केला आहे. त्यासोबतच कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण राजकारणात आल्याचं सुरेखा पुणेकरांनी सांगितल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

पुराच्या पाण्यातील बोलेरोचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

मैदानावर पुन्हा आवाज घुमणार! प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘मला रोहित शर्मासारखं…’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ धडाकेबाज क्रिकेटपटूची बायको रोहितवर फिदा!

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजच्या वडिलांनी तिच्यासाठी केलं असं काही की….

‘महाराष्ट्र एटीएस काय झोपलं होतं का?’; भाजपचा सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More