बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्मृती इराणींच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची हत्या करणारा पाचवा आरोपी अटकेत

लखनऊ | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे कार्यकर्ते सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

वसीम असं त्या आरोपीच नाव असून तो गोळीबारचा मास्टरमाईंड होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री वसीमला ताब्यात घेतलं.

पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तुल जप्त केलं. पोलिसांना पाहताच त्याने पोलिसांवर गोळीबार सुरु केला त्यावर पोलिसांनीदेखील गोळीबार केला. या चकमकीत 1 पोलीस आणि वसीम दोघेही जखमी झाले आहेत.

स्मृती इराणींच्या विजयात सुरेंद्र सिंह यांचं मोठं योगदान आहे. निकालानंतर दोन दिवसातच त्यांच्यावर पाच जणांनी गोळीबार करुन हत्या केली.

महत्वाच्या बातम्या

-“गेली 5 वर्ष वाट लावली, आता पुढील 5 वर्ष आणखी देशाची वाट लावणार”

-पाकिस्तानला लोळवत ख्रिस गेलने रचला नवा इतिहास

-…म्हणून अमोल कोल्हेंनी आपल्या पायातील चप्पल चाहत्याला दिली

-…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा; प्रकाश आंबेडकरांची टीका

-शिवसेनेला भीक म्हणून पुन्हा अवजड उद्योग खातं मिळालं- निलेश राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More