Suresh Dhas l सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच आज भाजप आमदार सुरेश धस यांनी एका मुलाखतीत मोठे गौप्य्स्फोट केले आहेत. यावेळी आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्याबाबत मोठे गौप्यस्फोट केले आहेत . सरपंच हत्या प्रकरणातील आका हे वाल्मिक कराड आहेत. तर आकाचे आका हे मंत्री धनंजय मुंडे आहेत, असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं आहे.
सुरेश धस यांनी कराडची कुंडलीच काढली :
दरम्यान, सुरेश धस म्हणाले की, “कुठेही विचारलं तरी 45 एकर जमीन वाल्मिक कराडची आहे. अमूकतमूक ठिकाणी विचारलं तरी 50 एकर जमीन वाल्मिक कराडची, बार्शी तालुक्यात 45 एकर, सोनपेठ तालुक्यात एका ठिकाणी 45 एकर, दुसरीकडे 50 एकर जमीन, शिरसी, तालुरा माजलगाव इथे 45 ते 50 एकर, आता मांजरसुंबा म्हणून गाव आहे तिथे देखील 45 एकर दुसऱ्या पत्नीच्या नावावर जमीन” असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे
“याशिवाय पुण्यातील मगरपट्टा सिटी तिथे शेजारी नवीन इमारत आहे. तिथे ड्रायव्हरच्या नावावर आख्खा मजलाच बुक केला असल्याचं धस म्हणाले आहेत. तसेच हे पैसे नेमके कोणाचे आहेत? तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचे पैसे नाहीत तर कुणाचे आहेत? तसेच आमच्या इकडे बऱ्याच प्रॉपर्टीमध्ये जैन मल्टिस्टेटची चौकशी सध्या सुरु आहे. त्यामध्ये देखील बहुतांश प्रॉपर्टीमध्ये धनंजय मुंडे यांच्या सौभाग्यवती आणि वाल्मिक कराड यांची नावे संयुक्तपणे असल्याचं दिसत आहे. तसेच मी यासंदर्भात एसीबीमध्ये सुद्धा चौकशी करणार आहे”, असं सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
‘वाल्मिक कराड तब्बल ‘इतके’ मोबाईल वापरतो’ :
सुरेश धस पुढे म्हणाले की, “अदाणी आणि अंबानी सुद्धा वापरत नसतील तेवढे मोबाईल वाल्मिक कराड वापरत आहेत. तसेच मी अंबानी यांना देखील विचारायला जाणार आहे की, तुम्ही नेमके किती मोबाईल वापरता? तसेच नीताताईंना जावून विचारतो. अंबानी यांचे कुणी पीए असतील यांना देखील विचारतो.”
याशिवाय आता “रतन टाटा यांच्या चिरंजीवांना जावून नतमस्तक होवून त्यांना देखील जाऊन विचारतो की, तुम्ही किती मोबाईल वापरता? कारण आमचे वाल्मिक आण्णा कराड हे तब्बल 17 मोबाईल वापरतात. त्यांचे 100 बँक अकाउंट सापडले आहेत. तसेच त्या अकाउंटमध्ये तब्बल 1000 कोटी पक्षा जास्त पैसे असतील”, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
News Title : Suresh Dhas Exposes Munde Karad Links Sarpanch Murder and Land
महत्वाच्या बातम्या –
संतोष देशमुखांच्या हत्येचं 3333 कनेक्शन, खळबळजनक माहिती समोर
लिव्हरचे 4 तुकडे, मान तुटलेली, बरगड्या पण…, मुकेश चंद्राकरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने सगळे हादरले
सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार?
पुन्हा लॉकडाऊन लागणार?; धडकी भरवणारी बातमी समोर
भारतात HMPV व्हायरसची एन्ट्री होताच मार्गदर्शक सूचना जारी!