नागपूर | पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. यावेळी सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला.
एका बाईनं नवीन पाटल्या घेतल्या होत्या. पण तिला कोणी विचारतच नव्हतं. तिनं दोघी-तिघींशी भांडून पाहिलं मात्र पाटल्यांबद्दल तिला कोणी विचारलंच नाही. शेवटी तिनं स्वतःच्या घरावर रॉकेल ओतलं आणि घर पेटवून दिलं. लोक जमा झाले. ती घरात जाण्याचा प्रयत्न करायची. लोक तिला बाहेर ओढत होते. ओढता ओढता एक माणूस म्हणाला, “पाटल्या चेंबतील”. तेव्हा ती बाई म्हणाली, “मुडद्या आधीच म्हणायचं की, घर कशाला पेटवलं असतं, अशी गोष्ट धस यांनी सांगितली.
दरम्यान, राष्ट्रवादीची अवस्था या बाईसारखी झाली आहे. माझ्या पाटल्या बघा, माझ्या पाटल्या बघा, असं काहीजण म्हणत आहेत, मात्र त्यांच्या पाटल्या कोणीच बघत नाही, असं धस म्हणाले.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
महत्त्वाच्या बातम्या–
-सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची खडाजंगी; सभापतीही वैतागले
-अविश्वास ठरावाच्या अगोदर सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
-अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी कोणत्या पक्षाला किती वेळ???
-विश्वासदर्शक ठरावाआधीच शिवसेनेनं भाजपचं ‘टेन्शन’ वाढवलं!
-अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी नरेंद्र मोदींचं ट्विट; पाहा काय म्हणाले