“खालचा अधिकारी उचलून खंडणी…”; सुरेश धसांनी वाल्मिक कराडचे कारनामेच केले उघड

Suresh Dhas on Walmik Karad  

Suresh Dhas on Walmik Karad | बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडला काल (31 डिसेंबर) पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तो स्वतः काल पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर नियमानुसार कराड याचं मेडिकल करण्यात आलं. त्यानंतर त्याला बीडच्या केज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने कराडला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. सध्या त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. अशात भाजपा आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा बीडमधील स्थितीबद्दल भाष्य केलंय. त्यांनी बीडमधील कारनामांचा पाढाच वाचला आहे. (Suresh Dhas on Walmik Karad)

भाजप आमदार सुरेश धस तसेच आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री ठेवण्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून वाल्मिक कराड प्रचलित आहे.त्यामुळे धनंजय मुंडे देखील अडचणीत सापडले आहेत.

काय म्हणाले सुरेश धस?

आमदार धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा कराडवर निशाणा साधलाय. त्यांनी कराडच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. या प्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी असून त्याचा आणि प्रतीक घुले या दोघांचा सहभाग जास्त आहे. वाल्मिक कराड शरण आला आहे. तो 100 टक्के 120 ब मध्ये आहे, पण त्याचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो पण 302 मध्ये येऊ शकतो, असं आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.

यावेळी धस यांनी 2023 मधील एका प्रकरणाचा देखील उल्लेख केला. ऑक्टोबर 2023 मध्ये पाटोदा तालुक्यातही असाच प्रकार घडला होता. तेव्हा मी सांगितलं होतं की परळी पॅटर्न आणू नका, खालचा अधिकारी उचलायचा आणि खंडणी मागायची असे प्रकार सुरू होते. असे प्रकार वाढल्याने दोन कोटींची खंडणी मागायची यांची हिम्मत झाली, असा थेट आरोपच धस यांनी केलाय. (Suresh Dhas on Walmik Karad)

सरपंच देशमुख यांची हत्या का झाली?

पुढे धस म्हणाले की, यांनी अगोदर 50 लाख घेतले.नंतर उरलेली दीड कोटी मागायला माणसं पाठवली होती. आकानेच (वाल्मिक कराड) ही माणसे पाठवली होती.या प्रकरणी मोका लावण्याची घोषणा आधीच मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे धस म्हणाले. (Suresh Dhas on Walmik Karad)

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांचा पवनचक्की प्रकल्पाबाबत सुदर्शन घुले नावाच्या व्यक्तीशी वाद झाला होता. याच प्रकरणी सुदर्शन घुले हा वारंवार खंडणीची मागणी करत असल्याची माहिती आहे. याबाबत सरपंच संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ देखील समोर आलाय. यातूनच त्यांची हत्या झाल्याची चर्चा आहे. सध्या वाल्मिक कराड हा कोठडीत असून त्याची आता पुढील चौकशी केली जाईल. या प्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत.

News Title : Suresh Dhas on Walmik Karad  

महत्त्वाच्या बातम्या-

यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला? पाहा सर्व सणांच्या तारखा एका क्लिकवर

न्यू इयरला मिळाली आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, पाहा आजचे दर

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज, गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

तरुणांनो नववर्षात रेल्वेत तब्बल ‘इतक्या’ जागा भरल्या जाणार; ‘असा’ करा लगेच अर्ज

वाल्मिक कराडला धक्का, केज कोर्टात झाला मोठा निर्णय!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .