बीड | मालगाडीने 16 जणांना चिरडून टाकल्याची घटना काल औरंगाबादजवळ घडली. या घटनेने देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. औरंगाबादच्या घटनेनंतर भाजप नेते सुरेश धस यांनी उद्विग्न होऊन आम्हा राजकारण्यांना काही लाज आहे की नाही?, असा सवाल उपस्थित केला आहे.
रेल्वेखाली चिरडून मेलेल्या 16 नागरिकांच्या मृत्यूला आम्हासकट सगळे राजकारणी जबाबदार आहेत. फक्त कागदोपत्री घोडे नाचवण्यात दिवस जात आहेत मात्र प्रत्यक्षात कृती शून्य असल्याची टीका त्यांनी केली आहे.
परराज्यात जाणारे लोक काही पाकिस्तानी नाहीत. कोरोनाने किती जीव गेले किंवा जातील हा संशोधनाचा विषय आहे मात्र सरकारच्या नसलेल्या समन्वयामुळे आपण आपल्याच माणसांना मुकतोय, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.
परराज्यातील नागरिकांना गावी जाण्यासाठी ठरवलेले धोरण हे कुचकामी आहे. तसंच वेळ दवडणारं आहे. माणुसकीच्या नात्यातून त्यांच्याकडे पाहायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त करत इथून पुढे सरकार आणि प्रशासनाने शहाण्यासारखं वागायला हवं, असं ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही- उद्धव ठाकरे
कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे- उद्धव ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत
आपण गाड्यांची व्यवस्था करतोय, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका- उद्धव ठाकरे
Comments are closed.