Suresh Dhas | बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad)हा देखील सध्या अटकेत आहे.पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागितल्या प्रकरणी कराडसह सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक झाली आहे. त्यांची सध्या कसून चौकशी केली जातेय. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा असल्याने ते देखील या प्रकरणात अडकले आहेत. यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जातेय. अशातच भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas ) यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल अत्यंत खळबळजनक दावा केलाय.
काय म्हणाले सुरेश धस?
पवनचक्की कंपनीकडून खंडणीसाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याच बंगल्यावर बैठक झाली. यातूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder Case) झाली असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. 14 जूनरोजी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पवनचक्कीचे मॅनेजर आणि वाल्मिक कराडसोबत बैठक झाली होती, असा दावाच धस यांनी केलाय.
कंपनीचे वरिष्ठ धनंजय मुंडे यांच्या पीएसोबत संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते. मुंडे यांचा जोशी नावाचा पीए असून कंपनीचे वरिष्ठ त्याच्याशी संपर्क साधत होते. त्यावेळी वाल्मिक कराडची सटकली. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर मुंबईत या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.याच बैठकीत 3 कोटींची डील झाली, असा आरोप सुरेश धस (Suresh Dhas ) यांनी केलाय.
धनंजय मुंडेंना बाहेर काढा, नाहीतर…
इतकंच नाही तर, वाल्मिक अण्णा उर्फ आका 17 मोबाईल नंबर वापरतात, असंही सुरेश धस यांनी म्हटलंय. वाल्मिक कराड टोळी ही बीडमध्ये गुंडगिरी करत असून त्याला धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद आहे, असं धस म्हणाले. त्यांच्या या आरोपांनी राजकारणासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.यावेळी धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही त्यांनी निशाणा साधला. “अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे. ते कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाही. या घटनेचा तुम्ही छडा लावा. खटला संपत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंना बाहेर काढा. राजीनामा घ्यायचा नसेल तर बिन खात्याचा मंत्री करा”, अशी मागणी धस (Suresh Dhas ) यांनी केली आहे.
News Title : Suresh Dhas serious allegations on Dhananjay Munde
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूने तडकाफडकी घेतली निवृत्ती
आज शनीचा उत्तरभाद्रपद नक्षत्र ‘या’ राशींना करणार धनवान!
‘खासदाराची चड्डी सुद्धा…’; पोलीस अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअॅप चॅटने पोलीस दलात खळबळ
“भिकाऱ्यांची संख्या वाढली, साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा”
धस सुसाट, मौनी दादांनाही मधे ओढलं, फडणवीसही दम देईनात, कारण काय?