धस सुसाट, मौनी दादांनाही मधे ओढलं, फडणवीसही दम देईनात, कारण काय?

Santosh Deshukh

Santosh Deshukh | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshukh) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आणि आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी राज्यात मोर्चे काढले जात आहे. बीड, बुलढाणा, परभणीनंतर रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार टोलेबाजी केली. परभणी आणि पुण्यात झालेल्या भाषणात सुरेश धसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली. धनंजय मुंडेंचा राजीनामा तुम्ही का घेत नाही, असा सवाल देखील धसांनी अजित पवारांना भाषणात विचारला.

सुरेश धस सुसाट

सुरेश धस वारंवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. संतोष देशमुख प्रकरणात सगळ्या पक्षातील नेते धनंजय मुंडेंवर टीका करत त्यांना लक्ष करत आहेत. मात्र दुसरीकडे हे सगळं घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख असलेले अजित पवार मौन बाळगून बसले आहेत. त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्यावर चकार शब्द देखील काढला नाहीये. असं असताना सुरेश धसांनी पुन्हा एकदा दादांना मध्ये ओढलं आहे.

आज पुण्यात बोलताना सुरेश धसांनी अजित पवारांवर सडकून टीका केलीये. सुरेश धस आता धनंजय मुंडेसह अजित पवारांवर टीका करत असल्याने राष्ट्रवादीचे नेते चांगलेच खवळले आहेत.

Santosh Deshukh | धसांना फडणवीस दम देईनात, कारण काय?

सुरेश धस यांच्या टीकेवर आता राष्ट्रवादीनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी, सुरज चव्हाण यांनी धस यांच्यावर पलटवार करतानाच गृहमंत्री फडणवीस यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे. परभणीच्या सभेत अजितदादांना क्या हुआ तेरा वादा… म्हणून प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णांना माझा प्रश्न आहे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत, मग गृहखाते झोपा काढत आहे का?, असा सवाल सुरज चव्हाण यांनी धसांना विचारलाय. तसेच सुरेश धसांना आता मुख्यमंत्र्यांनीच आवर घालावा. अजित पवारांवरची टीका आम्ही सहन करणार नाही. महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील, असा इशारा अमोल मिटकरींनी दिलाय.

देशमुख हत्या प्रकरणात विरोधी पक्षापेक्षाही सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने धनंजय मुंडे यांची चांगलीच कोंडी झाली. विरोधकांनी मुंडे यांचा राजीनामा मागितला पण दिवसेंदिवस धस आक्रमक होताना दिसत आहे. सत्तेत असलेल्या मित्र पक्षावर धस वारंवार टीका करतायेत, आरोप करतायेत, पण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्याने मुख्यमंत्रीही धसांना काही बोलेनात. धस अचानक नरमले तर भाजप धसांवर दबाव टाकत असल्याचा मेसेज सर्वांपर्यत जाईल, अशी चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

घटस्फोट झाल्यास चहलच्या बायकोला ‘इतक्या’ कोटींची पोटगी मिळणार ?

हिवाळ्यात डोकं नेमकं का दुखतं?, ‘या’ डोकेदुखीवर वापरा हे रामबाण उपाय

प्रयागराज कुंभमेळ्यात ‘या’ बाबांनी वेधलं सर्वांचं लक्ष, तब्बल 32 वर्ष केली नाही अंघोळ!

“देवेंद्रजी, धस यांना जाब विचारणार की बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?”

चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ; WHO ने दिली अत्यंत धक्कादायक बातमी

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .