मुन्नी मला घाबरत आहे?, सुरेश धस यांचा हल्लाबोल

Suresh Dhas

Suresh Dhas l बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र या घटनेने राज्यभर एकच खळबळ उडाली. मात्र आता या घटनेला एक महिना उलटला आहे, तरी देखील या प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच या घटनेप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मुन्नी या शब्दाचा पुनरुच्चार केला आहे.

मुन्नी मला घाबरत आहे? :

आज आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत. यावेळी सुरेश धस म्हणाले की, “जो आरोपी कमी वयाचा आहे, तो घाबरुन कुठेतरी बसला असेल. मात्र बाकीचे आरोपी पकडले गेले आहेत. तसेच जो आरोपी फरार आहे, तो पण लवकरच पकडला जाईल, तसेच जर वेळ पडली तर हे प्रकरण नार्को टेस्टपर्यंत देखील जाईल”, असे सुरेश धस म्हणाले आहेत.

दरम्यान, सुरेश धस यांनी बोलताना पुन्हा एकदा मुन्नी या शब्दाचा पुनरुच्चार केला आहे. यावेळी ते म्हणाले की, “ती मुन्नी आहे, तिला कळले आहे, पण ती मुन्नी महिला भगिणी नाही. तसेच ती मुन्नी राष्ट्रवादी मधलीच आहे. तसेच मुन्नीला माझंही आवाहन आहे की कुठेही येऊन बसावे. तसेच मुन्नीसोबत आमचे चार पाच फोटो देखील असतील. पण ती मुन्नी बोलत नाही, कारण मुन्नी मला घाबरत आहे. तसेच मुन्नीचे माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे आता आपण मुन्नीची वाट पाहूयात असा खुलासा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

Suresh Dhas l देशमुख कुटुंबाला न्याय द्या :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी राज्यातील विविध भागात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहेत. यावेळी या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. तसेच देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरातून नागरिक रस्त्यावर उतरत आहेत.

दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणातील सहा आरोपी पोलीस कोठडीत आहेत, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे केज पोलीस या आरोपीचा तपास करत आहे.

News Title : Suresh Dhas statement on munni

महत्वाच्या बातम्या –

‘अण्णा माझे दैवत…’ म्हणणारा बीडचा गोट्या गीते कोण?

“…तर सरपंच देशमुखांचे प्राण वाचले असते”; खळबळजनक खुलासा समोर

तुम्हालाही कुंभमेळ्याला जायचंय?; पुण्यातून धावणार विशेष ट्रेन, पाहा तिकीट दर

आरोपींना पोलीसच वाचवताय?, ‘त्या’ हत्याप्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप

थंडीत पाऊसही लावणार हजेरी, पाहा राज्यात कुठे-कुठे बरसणार?

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .