Suresh Dhas | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येप्रकरणातील संशयित मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह (Walmik Karad) सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे सध्या अटकेत आहेत. सरपंच हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी काल पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी वाल्मिक कराडसह (Walmik Karad) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अत्यंत खळबळजनक आरोप केले.
कुणाचे 50 पेक्षा अधिक बँक खाती असतील तर लगेच ईडी चौकशी लागते. पण, वाल्मिक कराडची 100 खाती सापडली आहे. तरीही कराडविरोधात कारवाई झालेली नाही, असा खुलासा सुरेश धस यांनी केलाय. इतकंच नाही तर, वाल्मिक अण्णा उर्फ आका 17 मोबाईल नंबर वापरतात. वालुकाका अँड गॅंग गँग्स ऑफ परळी यांच्यामुळे पुण्याचं नाव खराब होईल. त्यामुळे जिथे जिथे यांचे पुण्यात फ्लॅट्स असतील, यांची प्रॉपर्टी दिसेल, त्यावेळी मला फक्त कळवा, असं आवाहन देखील धस यांनी यावेळी केलं.
काय म्हणाले सुरेश धस?
पुढे धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील अत्यंत गंभीर आरोप केले. पवनचक्की कंपनीकडून खंडणीसाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याच बंगल्यावर बैठक झाली. यातूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder Case) झाली असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. 14 जूनरोजी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पवनचक्कीचे मॅनेजर आणि वाल्मिक कराडसोबत बैठक झाली होती, असा दावाच धस यांनी केलाय.
कंपनीचे वरिष्ठ धनंजय मुंडे यांच्या पीएसोबत संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते. मुंडे यांचा जोशी नावाचा पीए असून कंपनीचे वरिष्ठ त्याच्याशी संपर्क साधत होते. त्यावेळी वाल्मिक कराडची सटकली. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर मुंबईत या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.याच बैठकीत 3 कोटींची डील झाली, असा आरोप सुरेश धस (Suresh Dhas ) यांनी केलाय.
सुरेश धस यांनी अजित पवारांबाबत विधाने टाळावी- दरेकर
यावेळी सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधला. “अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे. ते कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाही. या घटनेचा तुम्ही छडा लावा. खटला संपत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंना बाहेर काढा. राजीनामा घ्यायचा नसेल तर बिन खात्याचा मंत्री करा”, अशी मागणी धस (Suresh Dhas ) यांनी केली आहे.
दरम्यान, सुरेश धस सतत अजित पवार यांना टार्गेट करताना दिसून येत आहेत. यावरच भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस यांनी अजित पवारांबाबत अशा प्रकारची विधाने करणे टाळायला हवे होते, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. तसेच धस यांना काही महत्त्वाची आर्थिक माहिती मिळाली असेल, तर त्यांनी ती एसआयटीकडे सुपूर्द करायला हवी, असंही दरेकर म्हणाले.
News Title : Suresh Dhas told bank details of Walmik Karad
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक
‘खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक?’; सुरेश धसांच्या आरोपांनी खळबळ
टीम इंडियाला धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूने तडकाफडकी घेतली निवृत्ती
आज शनीचा उत्तरभाद्रपद नक्षत्र ‘या’ राशींना करणार धनवान!
‘खासदाराची चड्डी सुद्धा…’; पोलीस अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअॅप चॅटने पोलीस दलात खळबळ