बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होईल”

सांगली | मुख्यमंत्री पदासाठी दगाबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राज्यसभा निवडणुकीने चांगला धडा  मिळाला आहे. येणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी पुर्णपणे बरखास्त होईल, असा मोठा दावा भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी केलाय.

भाजपच्या कार्यकाळाला 8 वर्ष पूर्ण झाल्याने कोल्हापूरचे माजी आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर(suresh halwankar) यांनी सांगली येथे कार्यकर्त्याशी संवाद साधला. या मेळाव्यात सांगलीचे अनेक आमदार-खासदार आणि दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी (Mamata Banerjee) यांचं नियोजन सुरू झालं आहे. अशात महाविकास आघाडी नंतर पश्चिम बंगालचे ही सरकार बरखास्त होईल, असंही ते पुढे म्हणाले.

सुरेश हाळणकरांनी केलेला हा दावा महाविकासआघडीचं टेंशन वाढवेल का? असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर आता महाविकास आघाडी काय उत्तर देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

Siddhant Kapoor | मोठी बातमी! अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ ड्रग्ज घेताना सापडला

महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं?; ‘या’ भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

पुण्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; आरोग्य विभागाने घेतला ‘हा’ निर्णय

“…तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील”

“एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल पण शरद पवारांच्या…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More