Loading...

घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली

जळगाव | घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले सुरेश जैन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना नाशिकच्या शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन अनेक दिवसांपासून अटकेत आहेत.

सुरेश जैन काही काळ धुळ्याच्या मध्यवर्ती कारागृहात होते. त्यानंतर ते नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. आज त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात हलवलं आहे.

Loading...

जळगाव घरकुल घोटाळ्यात न्यायालयाने माजी मंत्री गुलाबराव देवकर, सुरेश जैन यांच्यासह 48 आरोपींना दोषी ठरवलं होतं. न्यायालयाने सुरेश जैन यांना 7 वर्षांची शिक्षा तर 100 कोटींचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, सुरेश जैन यांच्यावर डॉक्टरांनी उपचार करायला सुरूवात केली आहे. आताच अधिक माहिती देण्यास डॉक्टरांनी नकार दिला आहे.

Loading...

‘श्रीराम समर्थ’ चित्रपटानिमित्त शंतनू मोघे यांच्याशी मारलेल्या खास गप्पा…

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...