Khokya Bhosale l भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश ऊर्फ खोक्या भोसलेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरूर तालुक्यात त्याची मोठी दहशत असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. या वेळी एका बाप-लेकाला अमानुष मारहाण करण्यात आली असून, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हरिणाच्या शिकारीतून वाद, मग बेदम मारहाण :
पीडित दिलीप ढाकणे यांची शिरूर तालुक्यात शेती आहे. त्यांच्या शेतात वारंवार हरणं येतात, ही बाब लक्षात घेत खोक्या भोसले आणि त्याच्या टोळीने त्या भागात जाळे लावले होते. दिलीप ढाकणे यांनी याला विरोध केला. याच वादातून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
ढाकणे यांच्या डोळ्यांसमोर एका जाळ्यात हरिण अडकलं होतं. त्यांनी याला विरोध करताच खोक्या भोसलेची टोळी संतापली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ढाकणे यांना मारताना पाहून त्यांचा मुलगा महेश ढाकणे मदतीसाठी धावला, पण त्यालाही सोडले नाही.
Khokya Bhosale l एका फोनवर टोळी जमा, लोखंडी रॉडने हल्ला :
मारहाण सुरू असताना आरोपींनी एका फोनवर लोक बोलावले. काही मिनिटांत स्कॉर्पिओ आणि इतर गाड्यांतून खोक्याच्या टोळीतील गुंड आले. त्यांनी बाप-लेकाला लोखंडी रॉड आणि दगडांनी बेदम मारहाण केली.
दिलीप ढाकणे यांच्या जबड्यावर दांड्याने मारले, त्यामुळे जबडा हलला. तसीच महेश ढाकणे यांच्या पायावर हल्ला करून फ्रॅक्चर केले. अधिक विरोध केल्यास हात-पाय तोडण्याची धमकी दिली. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली असून, संपूर्ण गाव भयभीत आहे.
News title : BJP Worker Suresh Khokya Bhosale Brutally Beats Father-Son Duo