“पेशवाई आणण्यासाठी धुंद झालेले ‘बंटी बबली’ आता राजकारणात धुमाकूळ घालत आहेत”
मुंबई | गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली. या प्रकरणी रोज नवी माहिती समोर येत आहे. तसेच पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा फोन टाॅपिंग प्रकरणात हात असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे माजी पोलीस अधिकारी पोलीस विभागाच्या कारभारावर चिंता व्यक्त करत आहेत. माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांना ‘बंटी बबली’ अशी उपमा देत त्यांच्यावर टीका केली आहे.
गृहमंत्र्यांनी एका कनिष्ठ अधिकाऱ्याला शंभर कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप पोलिस आयुक्तांनी केला ही तशी गंभीर घटना आहे. विरोधी पक्ष नेत्याने दखल घेणं रास्त आहे. पण त्याला काही मर्यादा? हे महाभाग मीडियाच्या माध्यमातून स्वतःच तपासी अंमलदार व स्वतःच न्यायाधीश बनून निवाडा करीत आहेत. आता त्याच्यासोबत पूर्वी महाराष्ट्राच्या गुप्त वार्ता विभागात काम केलेली रश्मी नावाची आयपीएस अधिकारी आली आहे. काल पासून ही बंटी बबलीची जोडी मिडियात धुमाकूळ घालतीय, असं सुरेश खोपडे त्यांच्या फेसबुक पोस्टमधून म्हणाले आहेत.
ही बबली सात वर्षेपेक्षा जास्त काळ नागपूरला होती. बंटीला राखी बांधत बबलीचं सुर जुळले. राखीच्या मोबदल्यात तिला पुण्याची कोतवाली/जहागिरी मिळाली. तिच्या सारा वसुलीच्या सुरस कथा पोलिस स्टेशन मधून आज ही ऐकायला मिळतात.बहुमत मिळालेल्या बंटीला महाराष्ट्राची पेशव्यांची गादी मिळावी म्हणून, बबलीने महाराष्ट्राचा सगळा गुप्त वार्ता विभाग कामाला लावला आहे, असं सुरेश खोपडे म्हणाले.
दरम्यान, “सगळ्यात दुबळ्या माणसासाठी कामकरा”, असं आमचे गांधी बाबा सांगतात, म्हणून जगभर त्यांचा आदर केला जातो. सनातनी ब्राह्मणी विचारावर आधारित पेशवाई आणण्यासाठी धुंद झालेल्या बंटी आणि बबलीला हे समजेलच! नाहीतर समजावून सांगावं लागेल!, अशी परखड टीका खोपडे यांनी केली आहे.
पाहा पोस्ट –
थोडक्यात बातम्या-
“महाराष्ट्र सरकारने 100 कोटींच्या वसुलीचा आधी हिशेब द्यावा”
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल!
‘…तर तो सरळ सरळ लोकशाहीचा खून आहे’; शिवसेनेची मोदी सरकारवर टीका
मोठी बातमी! महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यापालांची भेट
मुख्यमंत्र्यांनी ‘दूध का दूध पानी का पानी’ करावं- अनिल देशमुख
होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीबाबत पुणे महापालिकेेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.