बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आजचे हे अधिकारी अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर चाल सिंहाची दाखवतात, अन्…”

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बाॅम्ब’मुळे गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणात आता निवृत्त पोलीस अधिकारी समोर येऊन आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत. निवृत्त पोलीस महासंचालक सुरेश खोपडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट वरून काही आक्षेप नोंदवले आहेत.

बदली झाल्यावर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याची प्रत माध्यमांमध्ये जाईल याची सोय केली व देशभर एक हवा निर्माण केली गेली आहे. पत्र नैसर्गिक प्रतिक्रिया नसून कारवाई नंतर आलेल्या विचारातून लिहिल्यासारखं जाणवतं. यात सिंग यांच्याकडे कुठलाही कायदेशीर पुरावा नसून सामान्य माणसासाठी सनसनाटी व विरोधी पक्षासाठी चारा दिसत आहे, असं सुरेश खोपडे यांनी म्हटलं आहे.

मंत्र्यांनी दिलेल्या सूचना तपासी अंमलदार यांच्यावर बंधनकारक नसल्या तरी तपासी अंमलदार त्या सूचनांची नोंद तपासाच्या केस डायरी मध्ये करत असतात. ती नोंद करणे त्यांना बंधनकारक असते. केस डायरीतील नोंद यात पुराव्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. गृहमंत्र्यानी केलेल्या हस्तक्षेपाच्या नोंदी परमबीर सिंह यांनी केलेल्या आहेत का?, असा प्रश्न खोपडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुठभर आयपीएस अधिकारी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कायदा सुव्यवस्था राखायाचे काम करत आहेत. आजचे हे अधिकारी अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर चाल सिंहाची दाखवतात व वर्तणूक लबाड कोल्ह्याची करतात. पोलिस दलाची दुर्दशा व्हायला हेच आयएएस व आयपीएस नेतृत्व जबाबदार आहे. हे मी अनेक वर्ष मांडत आलोय, असं म्हणत खोपडे यांनी परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर जयंत पाटील म्हणाले…

‘100 कोटीच्या हिस्सेदारांची नुसती धावपळ चालली आहे’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान

उठसुट राजीनामा मागणं असा उद्योग विरोधकांचा सुरु झालाय- संजय राऊत

“राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का? सत्तेची इतकी लालसा आहे की…”

ना अजित पवार, ना जयंत पाटील; शरद पवार आपल्या ‘या’ विश्वासू माणसाकडे सोपवणार गृहमंत्रिपद?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More