बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पहिलं प्राधान्य लोकांच्या जीवाला, आयपीएल नंतर खेळवलं जाऊ शकतं- सुरेश रैना

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. माात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता 15 एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल याची शाश्वती नाही. अशातच पहिलं प्राधान्य लोकांच्या जिवाला, आयपीएल नंतर खेळवलं जाऊ शकतं, चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैनाने म्हटलं आहे. पीटीआयशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं.

आपण सर्वांनी सरकारने दिलेल्या सूचना पाळणं गरजेचं आहे. लॉकडाऊनचे नियम मोडले तर याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. त्यामुळे सरकारने दिलेल्या सूचनांचं पालनं करण्याचं आवाहनही रैनाने सर्वांना केलं आहे.

मी सध्या घरात आराम करतोय, जेवणं करणं, मुलांसोबत वेळ घालवणं. क्रिकेट सोडूनही आयुष्यात करण्यासारखं खूप काही असतं, असं म्हणत रैनाने इतर क्रिकेटपटूंना घरात बसण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, अनेक आजी-माजी खेळाडू, संघमालक यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम खेळवला जावा असं म्हणत आहेत. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आयपीएलचं भवितव्य नेमकं काय असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

दगडूशेठ गणपती ट्रस्ट मदतीला धावलं; केली गरजू नागरिकांना मदत

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितली मदत

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा उपद्रव रोखण्यासाठी जागतिक बँकेकडून 76 हजार कोटी रूपये; भारताला सर्वांत मोठा वाटा

आज जर दिवा किंवा मेणबत्ती लावणार असाल तर सरकारने केलेलं आवाहन नक्की वाचा…

सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More