मुंबई | मुंबईतील विमानतळावजवळ असेलल्या ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केलीये. या कारवाईमध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना याला अटक करण्यात आली. अटकेनंतर रैनाची जामिनावर सुटका देखील झालीये.
या सर्व प्रकारानंतर रैनाच्या व्यवस्थापन संघाकडून निवेदन जारी करण्यात आलंय. या निवेदनात सुरेश रैना एका शूटींगसाठी मुंबईत आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
“सुरेश रैना एका शूटींगसाठी मुंबईत आला होता. रैना रात्री दिल्लीला निघणार असताना त्याच्या मित्राने जेवणासाठी बोलावलं होतं. मात्र रैनाला स्थानिक वेळा आणि प्रोटोकॉलबाबतची माहिती नव्हती.” असं निवेदनात नमूद केलंय.
“या सर्व गोष्टींची माहिती मिळताच त्याने खबरदारी घेतली. शिवाय त्याने या घटनेबद्दल खेदही व्यक्त केलाय. सुरेश रैना नेहमीच प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करतो आणि भविष्यात देखील करत राहील” असंही निवेदनात म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाची लस घेतल्यावर ‘इतके’ दिवस मद्यपान करता येणार नाही!
“उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना”
मला केंद्रात मंत्रिपद मिळालं तरी…- सुजय विखे-पाटील
कोहलीच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी- गौतम गंभीर
“इंग्लंडमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूचा जास्त बाऊ करु नका, त्याऐवजी…”