मोदींना आणखी एक धक्का; पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉ. सुरजीत भल्लांचा राजीनामा

मोदींना आणखी एक धक्का; पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉ. सुरजीत भल्लांचा राजीनामा

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधानांच्या 5 सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. सुरजीत भल्ला यांनी राजीनामा दिला आहे.

सप्टेंबर 2017 मध्ये मोदी सरकारने आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली होती. नीती आयोगाचे सदस्य डॉ. विवेक देबरॉय हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत.

डॉ. सुरजीत भल्ला (अस्थायी सदस्य), डॉ. रथिन रॉय (अस्थायी सदस्य), डॉ. अशिमा गोयल (अस्थायी सदस्य) आणि रतन वाटाळ यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

आर्थिक तसेच त्या विषयांच्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांसंदर्भात पंतप्रधानांना सल्ला देण्याची जबाबदारी या परिषदेची होती. 

महत्वाच्या बातम्या –

-भाजपची नौका बुडत असल्याचं दिसताच शेअर बाजाराला पुन्हा मोठे हादरे

-भाजपला सर्वात मोठा धक्का; 3 राज्यांमध्ये सत्ता जाण्याची शक्यता

-काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता; 5 पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर

-पळवा-पळवीची भीती; काँग्रेसनं आपल्या विजयी उमेदवारांना दिले हे आदेश!

राजस्थानमध्ये काँग्रेस सुसाट; भाजपचं कमळ पडलं मागे…

Google+ Linkedin