बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आश्चर्य! कोरोना लसीमुळे 9 वर्षानंतर 70 वर्षीय आजीची डोळ्यांची दृष्टी आली परत

वाशिम | कोरोनानं देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण मोहिम राबवल्या जात आहेत. मात्र अनेक लोकांना अजूनही लसीकरण करण्याविषयी भीती वाटत असल्याचं पाहायला मिळत आहे. तोच दुसरीकडे लसीकरणामुळे अनेकांचे जुने आजार बरे झाल्याच्या घटना पाहायला मिळत आहे. अशातच वाशिममधील एका आजींनी कोरोना लस घेतल्यानंतर आपली डोळ्यांची दृष्टी परत आल्याचा दावा केला आहे.

वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी येथे राहणाऱ्या मथुराबाई बिडवाई या 70 वर्षाच्या आजींनी नऊ वर्षापूर्वी मोतीबिंदू झाल्यानं आपली दृष्टी गमावली होती. रिसोड येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविशील्ड या लसचा पहिला डोस घेतला आणि या आजीला आता दोन्ही डोळ्यांनी दिसायला लागलं, असा दावा या आजींनं केला आहे.

लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या वातावरणात 70 वर्षीय मथुरा बाईंची गेलेली दृष्टी परत आल्यानं  लस पूर्णपणे सुरक्षी आहे आणि ती घ्यायला हरकत नाही, असं डाॅक्टरांचं म्हणणं आहे.

दरम्यान, याआधीही अनेक ठिकाणी कोरोना लसीनं लोकांचे आजार बरे झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  सरकारकडून लसीकरणाबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती देखील केली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

”या’ प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करावा’; निवेदिता सराफ यांची मुख्यमंत्र्यांसह, राज ठाकरेंना विनंती

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक केव्हा होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

‘उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला’; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटावर कंगनानं उपस्थित केला प्रश्न, म्हणाली…

“माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप यामुळे सरकारने मला क्लीन चीट द्यावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More