अजित पवारांबद्दल मलाही बरंच काही बोलता येईल!

बीड | अजित पवारांबद्दल बरंच काही माहिती आहे, परंतु मी अजून काही बोललो नाही, अशा शब्दात भाजपशी घरोबा केलेल्या सुरेश धसांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. ते बीडमध्ये बोलत होते.

राष्ट्रवादीत जोपर्यंत मी काम करतोय, तोपर्यंत गद्दारांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही. ज्यांनी स्वतःच्या पहिलीला सोडलं नाही ते इतरांना काय सोडणार?, असं म्हणत अजित पवार यांनी सुरेश धस यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या धस यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं

दरम्यान, अजित पवार आणि सुरेश धस यांच्यामध्ये वैयक्तिक पातळीवर चिखलफेक सुरू आहे.