बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईचा सुर्या तळपला, हैदराबादच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं, 235 धावांचं लक्ष्य!

मुंबई | मुंबई इंडिअन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात मुंबईच्या फंलजांनी हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. मुंबईने एकूण 30 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी केली. इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईने हैदराबादला 236 धांवाचं लक्ष्य दिलं आहे.

मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि इशान किशनने आक्रमक सुरूवात केली. रोहित लवकर बाद झाला परंतू दुसरीकडे इशान किशनने आपलं दांडपट्टा सुरूच ठेवला होता. दुसरीकडे पंड्या आणि पोलार्ड लवकर बाद झाले आणि शतकाच्या जवळ आलेला किशनाही बाद झाला.

मुंबईची धावसंख्या 200 च्या वरही जात नाही असं वाटत होतं मात्र सुर्यकुमारने चौफेर फटके मारत हैदराबादच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. दुसरीकडे गडी बाद होत होते तर सुर्यकुमारने एक बाजूू लावून धरली होती. 19 व्या षटकात सुर्यकुमारच्या हेल्मेटवर चेंडू लागला त्यानंतर सुर्यकुमार होल्डरच्या गोलंदाजीवर बाद झाला.

दरम्यान, इशान किशनने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक केलं आहे. इशानने अवघ्या 32 चेंडूत 84 धावांची खेळी केली. यामध्ये 11 चौकारांसह 4 षटकार ठोकले आहेत. यंदाच्या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक मारणाऱ्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी मुंबईला 171 धावांनी विजय मिळवायचा आहे त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या- 

छोटा पॅकेट बडा धमाका, इशान किशनचा धुमधडाका, इतक्या चेंडूतच पठ्ठ्याने ठोकलं अर्धशतक!

मोदी सरकारला मोठा धक्का! मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यम यांचा राजीनामा

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावर भाजपचा बहिष्कार; राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल!

‘सोशल मीडिया हे भ्याड लोकांचं ठिकाण, आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्यांना…’; पंतप्रधान संतापले!

“तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More