सुर्यकूमार यादवने कर्णधारपदावरून रोहित शर्मावर साधला निशाणा? म्हणाला, “मी त्याच्यासारखं करत नाही कारण…”

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav l इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत (T20 Series) टीम इंडियाचे (Team India) पारडे जड झाले आहे. भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकून मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. आता उर्वरित तीन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवला की मालिका खिशात जाणार आहे. असे सर्व सकारात्मक वातावरण असताना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) तुलनेत कर्णधारपद भूषवण्याची पद्धत वेगळी असल्याचे त्याने सांगितले आहे.

रोहित शर्मा सामन्यादरम्यान केलेल्या मिश्किल वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अनेकदा तो काय बोलतो हे स्टंप माईकमध्ये (Stump Mic) रेकॉर्ड होते आणि चर्चेचा विषय ठरते. “रोहित शर्माने गार्डनमध्ये फिरत आहात का?” हे त्याचे वक्तव्य आजही चर्चेत असून त्यावर मीम्स (Memes) तयार केले जात आहेत. सूर्यकुमार यादवने यावर आपले मत स्पष्ट केले आहे.

रोहित शर्माने टी-२० फॉर्मेटमधून (T20 Format) निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवने टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे. तसेच कर्णधारपद भूषविताना रोहित शर्मा आणि त्याच्यातील फरक सांगितला आहे.

स्टंप माइकपासून दूर राहणे पसंत करतो :

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवला विचारले गेले की, तो खेळाडूंना थांबवतो का? यावर सूर्यकुमार यादवने सांगितले की, “मी रोहितसारखे करत नाही. कारण कोणी गार्डनमध्ये फिरतच नाही.” दरम्यान, सूर्यकुमार यादव स्टंप माईकपासून दूर राहणेच पसंत करतो. तसेच एखाद्याची खासियत असेल तर ती त्याच्याकडे राहणे सर्वात चांगले आहे, असेही तो म्हणाला.

सूर्यकुमार यादवने या माध्यमातून सांगितले की, स्टंप माईक आणि रोहित शर्माची जुगलबंदी तशीच राहिली तर बरे. सूर्यकुमार यादवला रोहित शर्माची ‘ये-वो’ भाषा समजते का? यावरही प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने सांगितले की, “हो. जेव्हा आम्ही गार्डनमध्ये फिरतो तेव्हा आम्हाला ते ऐकायला मिळते.”

कर्णधारपदाचे दडपण? :

टी-२० संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. पण त्याच्या फॉर्मची (Form) चिंता मात्र क्रीडाप्रेमींना (Sports Fans) लागून आहे. मागच्या काही सामन्यांत सूर्यकुमार यादवची बॅट हवी तशी तळपलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर कर्णधारपदाचे दडपण आहे का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. आता तिसरा टी-२० सामना राजकोटमध्ये (Rajkot) होणार आहे. या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

News Title: suryakumar-yadav-on-captaincy-style-difference-with-rohit-sharma

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .