मनोरंजन

“सुशांतसिंह राजपूतचा त्याच्याच कुत्र्याच्या बेल्टने गळा दाबून खून”

मुंबई | बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. दररोज समोर येणाऱ्या नवनवीन गोष्टींमुळे या प्रकरणातील गुंता आणखीनच वाढत चालला आहे. सुशांतची आत्महत्या की हत्या? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मात्र सुशांतच्या माजी सहायक अंकित आचार्यने केलेल्या एका विधानानं आता एकच खळबळ उडाली आहे.

सुशांतला मी चांगला ओळखतो, सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. फज नावाच्या कुत्र्याच्या बेल्टने सुशांतचा गळा आवळण्यात आला आहे. ही आत्महत्या नसून हत्याच आहे, असा दावा अंकितनं एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

जर समजा आपण हे मान्य केलं की सुशांतने आत्महत्या केली. तर आत्महत्या केल्यावर व्यक्तीच्या गळ्यावर यु शेपचा आकार येतो. मात्र जर कोणी गळा दाबायचा प्रयत्न करतो, त्यावेळी गळ्यावर ओ शेपचा आकार येतो. सुशांतच्या गळ्यावर सुद्धा ओ शेप होता, असं खळबळजनक विधानंही अंकितनं यावेळेस केलं आहे.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचा तपास नव्या वळणावर जाऊन पोहचला आहे. सीबीआयकडून सुशांतच्या संबंधीत प्रत्येक व्यक्तीचा कसून तपास करण्यात आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पुन्हा ईडी कार्यालयात दाखल

कोरोनाला ‘चायनिज फॅड’ म्हणणाऱ्या डाॅ. अनिल पाटील यांचं निधन

अयोध्येतील राम मंदिर निर्माणाला पार्थ पवारांच्या पत्रातून शुभेच्छा, म्हणाले….

नारायण राणेंना कामधंदा उरला नाही म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

‘भारतीय म्हणजे हिंदी असं हे समीकरण कधीपासून झालं?’; द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या