बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Sushant Singh Rajput मृत्यू प्रकरणाला नवं वळण, प्रसिद्ध अभिनेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई | बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) मृत्यू होऊन 2 वर्षे उलटली आहेत. सुशांतच्या मृत्यूची बातमी समोर आली सगळ्यांनाच धक्का बसला. त्याच्या मृत्यूला 2 वर्ष होऊनपण त्याच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे.

सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप अनेकांनी केला. सुशांतचं मृत्यूप्रकरण खूप गाजलं, याचा तपास झाला पण त्याचा नेमका मृत्यू कसा झाला हे अद्यापही एक कोडं आहे.

सुशांतच्या मृत्यूवरून अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या (Amir Khan) भावाने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली असल्याचा दावा फैजल खानने (Faizal Khan) केला आहे.

दरम्यान, हा खटला पुन्हा कधी सुरू होणार आणि सर्वांसमोर सत्य कधी येणार हे तर वेळच सांगेल, असंही फैजल खान म्हणाला. मात्र, फैजल खानने केलेल्या या दाव्यामुळे सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

थोडक्यात बातम्या-

‘स्वत:च्या घरात पाळणा हलत नाही म्हणुन दुसऱ्यांच्या घरात बोटं मोडायची’, शिवसेनेचा हल्लाबोल

“बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून बदनाम करत आहात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More