Top News मनोरंजन विदेश

दिवंगत अभिनेता सुशांतला कॅलिफोर्नियाकडून मरणोत्तर पुरस्कार

कॅलिफोर्निया | आज 15 ऑगस्ट आहे. आजच्याच दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. भारत स्वातंत्र्य झाल्याचं औचित्य साधत कॅलिफोर्नियाने एक स्युत्य काम केलंय. 15 ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने सर्वांच्या मनात घर करून बसलेल्या सुशांत सिंग राजपूतला मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला आहे.

कॅलिफोर्निया राज्य विधानसभेने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्ती हिने हा पुरस्कार स्विकारला आहे. सुशांतने अनेक सामाजिक कार्यांमध्ये वाटा उचलला होता. त्याच्या या कार्याचं कौतुक म्हणून त्याचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे.

सुशांतची बहिण श्वेताने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. श्वेता तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कॅलिफोर्नियाने माझ्या भावाचा म्हणजेच सुशांत सिंग राजपूतचा सन्मान केला आहे. कॅलिफोर्निया आमच्या सोबत आहे…तुम्ही आहात का? कॅलिफोर्नियाने आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.”

14 जून रोजी सुशांत सिंगने आत्महत्या केली. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनीही अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान सध्या मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि ईडीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

जे दिसतात ते सोबत नसतात, जे सोबत असतात ते दिसत नाहीत- उद्धव ठाकरे

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

कोझिकोड दुर्घटना; बचाव पथकातील तब्बल 20 अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

स्वातंत्र्यदिनाला गालबोट; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या