बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण…

मुंबई |  राजबिंडा चेहरा, अगदी प्रसन्न वाटणारं व्यक्तीमत्व आणि अभिनयात निपुन असलेला सुशांत… त्याने अवघ्या 34 व्या वर्षी जगाला रामराम ठोकत पुढच्या प्रवासाला निघून गेलाय.  त्याच्या निधनाने बॉलिवूडमध्ये सन्नाटा पसरलाय. अशातच सुशांतबद्दल आता नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात सुशांत लग्न करणार होता, अशी माहिती सुशांतच्या चुलत भावाने दिली आहे.

त्याच्या चुलत भावाने इंडिया टीव्हीशी बोलताना दिलेली माहिती अशी, “नोव्हेंबर महिन्यात त्याचं धुमधडाक्यात लग्न होणार होतं. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती. आम्ही कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला देखील येणार होतो.”

सुशांतचं लग्न कोणासोबत होणार होतं हे मात्र सुशांतच्या भावाने सांगितलं नाही. सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता. त्याचा परिवार बिहारमधल्या पाटनामध्ये राहत आहे.

सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या कुटुंबियांना टीव्हीवरूनच मिळाली. ही बातमी कळकाच सुशांतच्या वडिलांची शुद्ध हरपली. काही काळानंतर ते भानावर आले. आज सुशांतवर मुंबईत अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यासाठी त्याचे कुटुंबिय बिहारवरून मुंबईत येणार आहेत.

 

 

View this post on Instagram

 

Receive without pride, let go without attachment. #Meditations

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

 

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 320 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

‘…अब शहर भर में ज़िक्र मेरी खुदकुशी का है’; सुशांतच्या आत्महत्येनंतर संजय राऊत हळहळले

महत्वाच्या बातम्या-

सुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असतील किंवा फॉरवर्ड कराल तर… ; पोलिसांचा कडक इशारा

सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय लिहिलंय माहितीये…. पाहा-

विशाल पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला लाखमोलाची मदत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More