Top News मनोरंजन

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची पोलिसांकडून होणार चौकशी

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे. यासंदर्भात पोलिसांकडून अनेक जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून संजय लीला भन्साळी यांची चौकशी करण्यात येणारे. याशिवाय यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांची देखील चौकशी होणार आहे. मुख्य म्हणजे शानू शर्माची याआधी एकदा पोलिसांकडून चौकशी झाली होती. 28 जून रोजी त्यांनी वांद्रेच्या पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावली होती.

शानू शर्मा यांनी सुशांतसोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ या दोन चित्रपटांसाठी काम केलेलं. तसंच अभिनेत्री कंगना राणावत आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांचीही पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर या दोघांनी सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. त्यामुळे त्यांचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे.

सुशांतने 14 जून रोजी मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्याच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद ऐरणीवर आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 27 जणांचे जबाब नोंदवले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमणार- अमित देशमुख

कोरोना व्हायरस आपोआप नाहीसा होईल- डोनाल्ड ट्रम्प

मी माझ्या मुलांना आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत- अक्षय कुमार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या