Top News मनोरंजन

सुशांतच्या आत्महत्येनंतर स्वरा भास्कर मोठं वक्तव्य, म्हणते…

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. सुशांतने आत्महत्या का केली यावरून सोशल मिडीयावर अनेक चर्चा सुरु आहेत. यामध्ये स्वरा भास्करचा एका व्हिडीयो सध्या व्हायरल होत असून त्यामध्ये ती करण जोहरला भाई-जातियवादावर प्रश्न विचारत आहे.

स्वराच्या म्हणण्यानुसार, “कठोर बोलण्याची एक सभ्य पद्धतही असते. सध्या अनेकजण इतरांना दोष देतायत. मात्र सुशांतच्या करियमध्ये काय झालं याला करण जोहर, आलिया भट, सोनम कपूर यांना जबाबदार धरू शकत नाही आणि मुळात हे योग्य नाही.”

“जे काही घडलं ते फार दुःखद आहे. मात्र मला राग या गोष्टीचा येतो की लोकं छुप्या हेतूंसाठी सुशांतच्या निधनानंतर सुरु झालेल्या वादाचा वापर करतायत. हे लज्जास्पद आहे. सुशांत एक उत्तम कलाकार होता आणि आपण त्याला आदर दिला पाहिजे.” असंही स्वरा म्हणाली.

याशिवाय सुशांतच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्य आणि डिप्रेशन हे चर्चेचे विषय असले पाहिजेत असंही स्वराचं म्हणणं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

तब्बल 1 कोटी लोकांची शिवभोजन थाळीने भागवली भूक, मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेचं कौतुक

महत्वाच्या बातम्या-

सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला द्यावा; आणखी एका काँग्रेस नेत्याचा शरद पवारांना टोला

या कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी राज्य शासनाची रेल्वे मंत्रालयाला विनंती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या