बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

मुंबई। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 2020 साली राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यावेळेस सुशांतचा मृतदेह पाहणारा सिद्धार्थ पिठाणी होता. सिद्धार्थ पिठाणी सुशांतचा फ्लॅटमेट असून त्याने सर्वात आधी त्याचा मृतदेह पाहिला होता. सुशांतच्या मृत्युशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीसह सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau) 2021 साली सिद्धार्थ पिठाणीला हैद्राबादमधून अटक केली होती. त्याच्यावर अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स तसेच कलम 27 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आपल्याला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गुंतवण्यात आल्याचा दावा करत सिद्धार्थ पिठाणीने जामीन अर्ज केला. या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा देखील पिठाणीने केला होता.

सिद्धार्थ पिठाणीच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली असून या प्रकरणी सिद्धार्थचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे. 50 हजार रूपयांच्या जातमुचकल्यावर सिद्धार्थचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, असा संभ्रम पाहायला मिळत होता. त्यातच या प्रकरणाला वेगळं वळण लागलं व सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने हा तपास हाती घेतला. त्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्तीसह सिद्धार्थ पिठाणीला अटक केली होती. तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची त्यावेळी एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार बोलतात त्याच्या नेहमी उलट होतं, त्यामुळे…”

ओमायक्राॅनचा नवीन सबवेरीअं

‘…ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र’, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

‘दाल मे कुछ काला है, 106 आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यंमंत्री होत नाही म्हणजे काय?’

‘…तर शिंदे साहेब महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल’, शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More