बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतबाबत ती पोस्ट करणं करण जोहरला पडलं भारी; इतके लाख फॉलोअर्स झाले कमी

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र अनेक कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. तसेच सर्वात जास्त दोष निर्माता करण जोहरला दिला जात आहे.

करणने सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली होती. मात्र या पोस्टमुळे नेटकरी प्रचंड संतापले. यामुळे करणची सोशल मीडियावरील लोकप्रियता कमी झाली आहे.

करणचे 10 लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले. यापूर्वी त्याला तब्बल 1 कोटी 10 लाख लोकं फॉलो करत होते. मात्र आता या प्रकरणामुळे हा आकडा आता 1 कोटींवर आला आहे.

गेल्या वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. या गोष्टीचा मला खेद आहे, अशा आशायाची पोस्ट लिहून करणने सुशांतला श्रद्धांजली दिली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

…तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला?- संजय राऊत

“नेहरूंचं परराष्ट्र धोरण चुकलं म्हणून टाळ्या मिळतील पण सैनिकांचं बलिदान थांबवण्याची जबाबदारी मोदींचीच”

महत्वाच्या बातम्या-

देशात कोरोनाचा हाहाकार, रूग्णसंख्येत आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ

“उद्धव, मुलायम, धिरूभाई… घराणेशाही कुठे नाही?”

ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसाठी मंत्री हसन मुश्रीफांची खुशखबर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More