बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनं अक्षय कुमारला धक्का; म्हणाला…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीसह त्याचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. सुशांतच्या आत्महत्येवर अभिनेता अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षय कुमारने ट्विट करून सुशांतबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. खरंच या बातमीमुळे मी स्तब्ध आणि अवाक झालोय, असं ट्विट अक्षय कुमारने केलंय.

मुंबईतील राहत्या घरात सुशांतने गळफास घेत आपल्या जीवनाला पूर्ण विराम दिला. सुशांतच्या घरी नोकरी करणाऱ्या व्यक्तीने बांद्रा पोलिस स्थानकात याबाबतची माहिती दिली आहे. सुशांतच्या आत्महत्येपाठीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये.

सुशांत सिंग हा आघाडीचा नायक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही सिरीअलमधून केली होती. पवित्र रिश्ता ही त्याची मालिका चांगलीच गाजली होती आणि आजही तो घराघरात याच मालिकेमुळे ओळखला जातो.

 

ट्रेंडिंग बातम्या-

राष्ट्रवादीचा ‘या’ माजी आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू, राजकीय क्षेत्रात खळबळ

‘माझं आयुष्य तुम्हाला घ्या’, बाळा नांदगावकरांची राज ठाकरेंसाठी खास फेसबुक पोस्ट

महत्वाच्या बातम्या-

‘आमची कधी भेट झाली नव्हती, पण…; सुशांतच्या मृत्यूवर लता मंगेशकरांनी व्यक्त केल्या भावना

सुशांतच्या जाण्याने मला धक्का बसलाय; उद्धव ठाकरेंनी वाहिली आदरांजली

अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं आत्महत्या करुन संपवलं जीवन, राहत्या घरी घेतली फाशी…!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More